समाजमाध्यमामुळे अपघातग्रस्ताला मिळाला मदतीचा हात

समाजमाध्यमामुळे अपघातग्रस्ताला मिळाला मदतीचा हात

वसई, ता. २१ (बातमीदार) : समाजमाध्यम म्हटले की त्याचा सकरात्मक व नकारात्मक वापर दिसून येतो. अफवांचा पाऊस मोठ्या प्रमाणात असतो; मात्र समाजातील सुजाण मंडळी या माध्यमांचा चांगला वापर करत असून सामाजिक बांधीलकी जपत आहे. त्यामुळे अर्नाळा येथील एका अपघातग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदतीचा ओघ निर्माण झाला आहे. विरार येथील अर्नाळा बंदरपाडा गावातील गजानन अनंत म्हात्रे हा काही महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता; मात्र एका अपघातात कमरेला दुखापत झाल्याने तो अंथरुणाला खिळून राहिला. त्याच्या उपचारांसाठी पैशांची चणचण भासत होती. अशा वेळी एका व्हॉट्सॲप समूहाचे ज्येष्ठ सदस्य उमेश मेहेर यांनी समाजमाध्यमांचा वापर करत व्हाट्सॲप समूहाच्या सदस्यांना ही माहिती दिली. या एका संदेशाने ४४ हजारांची रक्कम क्षणार्धात उभी राहिली. यात कोणी सफाई कर्मचारी होता, कोणी महापालिका कर्मचारी होता, कोणी पोलिस बांधव; तर कोणी बोटीवर जाणारे खलाशी आदींचा समावेश आहे. आपण समाजाविषयी काही देणं लागतो या भावनेतून मदत उभी राहिली व समाजासमोर आदर्श निर्माण झाल्याचे अर्नाळा गावचे पाटील दयानंद धर्मा म्हात्रे यांनी सांगत ही मदत म्हात्रे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com