कंटेनर उलटल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प

कंटेनर उलटल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प

ठाणे, ता. २१ : बारा टन बटर टोस्ट घेऊन निघालेला कंटेनर उलटल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान हा अपघात घडला. दरम्यान, उलटलेल्या कंटेनरमधून तेल रस्त्यावर पसरल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात चालक राकेश बाबू (वय ५०) हा किरकोळ जखमी झाला आहे. चालक राकेश बाबू हा खोपोली येथून गुजरात, सुरत येथे घोडबंदर रोडने सोमवारी मध्यरात्री १२ टन बटर टोस्ट भरलेला कंटेनर घेऊन निघाला होता. पातलीपाडा येथे कंटेनर आल्यावर दीडच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटून कंटेनर रस्त्यावर उलटला. यामध्ये चालक राकेश बाबू यांच्या डोक्याला व पायाला खरचटल्याने किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच चितळसर पोलिस कर्मचारी, कासारवडवली वाहतूक पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंबासह दाखल झाले. कंटेनर क्रेन मशीनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेल सांडलेल्या भागात पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याचदरम्यान पातलीपाडा सर्विस रोडवरील वाहतूक सुमारे दोन तास बंद होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com