कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटरावर गुन्हा दाखल

कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटरावर गुन्हा दाखल

पनवेल, ता. २१ (वार्ताहर) : इमारतीत साफसफाईचे काम करताना सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे कर्मचाऱ्या मृत्यू झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी तळोजा येथे घडली होती. इम्रान हुसेन मोल्ला (वय १९) असे मृत कामगाराचे नाव असून त्याच्या मृत्यूला जबाबदार ठरवून रविवारी (ता. २०) कंत्राटदाराविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिंजण गाव येथील महावीर एक्जोटिक या बांधकाम साईटचे विकसक ओमप्रकाश छाजेड यांनी आर. जे. एंटरप्रायजेसचे मालक रवींद्र अकालू मौर्या याला इमारतीच्या साफसफाईचे कंत्राट दिले होते. त्यांच्यामार्फत इम्रान मोल्ला हा महावीर एक्जोटिक येथे सफाई कामगार म्हणून काम करत होता; मात्र कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची जाळी लावली नव्हती. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी इम्रान हा इमारतीच्या सातव्या मजल्यावर साफसफाईचे काम करत असताना पाय घसरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी आर. जे. एंटरप्रायजेसचे मालक रवींद्र मौर्या याला जबाबदार धरून त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com