डेटिंगच्या निमित्ताने सायबर फसवणूक...आरोपी तामिळनाडूतून अटकेत

डेटिंगच्या निमित्ताने सायबर फसवणूक...आरोपी तामिळनाडूतून अटकेत

डेटिंगच्या निमित्ताने
सायबर फसवणूक
आरोपी तमिळनाडूतून अटकेत

मुंबई, ता. २१ : डेटिंग सेवा देण्याच्या निमित्ताने मुंबईतील एका २८ वर्षीय तरुणाची २ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वरुण विद्यागर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला तमिळनाडूमधून अटक केली.
फसवणुकीची घटना २४ ते २५ मेदरम्यान घडली. तक्रारदार तरुण अविवाहित असल्याने डेटिंग ॲपच्या शोधात होता. ऑनलाईन सर्चिंगदरम्यान त्याला एका ॲपची माहिती मिळाली. त्यावर त्याने आपला तपशील नोंदवला. त्यानंतर त्याच्या खात्यातून २.३४ लाखांची रक्कम वजा झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे लोकेशन तमिळनाडूमधील शिवगंगा येथे सापडले. तातडीने पोलिसांचे एक पथक तमिळनाडूला रवाना झाले.स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी विद्यागरला अटक करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी तक्रारदाराचे १.४५ लाख रुपये जप्त केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com