कल्याणमधील गुंडाची येरवडा कारागृहात रवानगी

कल्याणमधील गुंडाची येरवडा कारागृहात रवानगी

डोंबिवली, ता. २१ : सहा गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या गुंड साजीद ऊर्फ शानू मोहंमद अकील शेख (वय २५) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली करून त्याची रवानगी एक वर्षासाठी पुण्यातल्या येरवडा कारागृहात केली आहे. कल्याण शहरात वाढती गुन्हेगारी, हत्यांच्या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे पोलिसांनी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. कुख्यात गुंड साजीदविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव जमवणे, गंभीर दुखापती करणे, शस्त्र जवळ बाळगणे, दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल होते. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी साजीदवर प्रतिबंधात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना पाठवला होता. आयुक्तांनी या आदेशावर शिक्कामोर्तब करताच महात्मा फुले चौक पोलिसांनी एक वर्षासाठी साजीदला स्थानबद्ध करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com