ठाणे स्थानकात बुधवारी रात्री पॉवर ब्लॉक

ठाणे स्थानकात बुधवारी रात्री पॉवर ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी बुधवारी (ता. २३) रात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घेण्यात येणारा ब्लॉक अप जलद आणि पाचव्या मार्गिकेवर असणार आहे. तसेच बुधवारी रात्री अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि पाचव्या रेल्वे मार्गिकेवर तसेच ठाणे स्थानकातील प्लॅटफार्म ६ आणि ७ वर रात्री ११.५५ पासून गुरुवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. यादरम्यान मुंबईत येणाऱ्या हावडा-मुंबई एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस, चैन्नई-मुंबई एक्स्प्रेस आणि पुदुचेरी-दादर एक्स्प्रेस सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबईतून जाणाऱ्या मुंबई-मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी तेजस एक्स्प्रेस पाचव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

--------------
या दोन लोकल रद्द
बुधवारी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटणारी १५ डब्यांची कल्याण लोकल आणि कल्याणहून रात्री ११.०५ वाजता सुटणारी सीएसएमटी १५ डब्यांची लोकल रद्द केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com