थकबाकी माफी अभय योजनेबाबत कार्यशाळा

थकबाकी माफी अभय योजनेबाबत कार्यशाळा

मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र सरकारच्या ‘अभय योजना-२०२३’चा करदात्यांना लाभ घेता यावा यासाठी मुंबईतील ‘आयसीएआय’च्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत मूल्यवर्धित कर व संलग्न कायद्यांतर्गत थकबाकीदार करदात्यांकरिता वांद्रे पूर्वेतील ‘डब्ल्यूआयआरसी-आयसीएआय’ सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या वेळी अनुभवी सनदी लेखाधिकारी व जीएसटी विभागातील राज्य कर सहआयुक्त उपस्थित राहणार असून उपस्थित व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना व त्यांच्या कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमास जीएसटी विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील, जीएसटी विभागाचे अप्पर राज्य कर आयुक्त अजित चाहुरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com