मॅनहोलच्या पहाणीची डेडलाईन हुकली

मॅनहोलच्या पहाणीची डेडलाईन हुकली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : मुंबईतील मॅनहोल बंदिस्त की उघडे, याची तपासणी करण्यासाठी आजपासून उच्च न्यायालयाने नेमलेले तज्ज्ञ वकील व सहायक आयुक्त संयुक्त पाहाणी करणार होते; मात्र वकील कामकाजात व्यस्त असल्याने मुंबई व शहरातील अनेक मॅनहोलची तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मॅनहोल पाहणीची डेडलाईन हुकली आहे. आज सहायक आयुक्तांनी प्रमाणपत्र सादर केले असून, उच्च न्यायालयात ते सादर करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

मुंबईतील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी मॅनहोल बंदिस्त करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तसेच तज्ज्ञ वकील व सहायक आयुक्तांनी मॅनहोल उघडी की बंदिस्त, याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. २० ऑगस्टपर्यंत पाहणी करत २१ ऑगस्ट रोजी सकाळी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी संबंधितांना दिले होते. त्यानुसार सोमवारी प्रमाणपत्र सादर केले असून ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

तीन आठवड्यांत न्यायालयाला अहवाल
मॅनहोलविषयक कार्यवाहीचा पडताळणी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत सादर करायाचा आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ज्ञ वकील, तसेच संबंधित सहायक आयुक्त यांनी संयुक्त पाहणी केलेला अहवाल त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशासन न्यायालयाला सादर करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com