डहाणूकरांची एक धाव उत्तम आरोग्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूकरांची एक धाव उत्तम आरोग्यासाठी
डहाणूकरांची एक धाव उत्तम आरोग्यासाठी

डहाणूकरांची एक धाव उत्तम आरोग्यासाठी

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू-वाकी येथे आमदार मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष होते. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयोगटानुसार विभाजन करून दोन गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. डहाणू तालुक्यातील शाळकरी विद्यार्थी, पुरुष, महिला, वयोवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात यथार्थ दवणे याने प्रथम, रोनित पालवा याने द्वितीय, तर आरूश उंबरसाडा याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात जिदिशा सांबर हिने प्रथम, सरिता पडवळे हिने द्वितीय, रेणुका पालवा हिने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आकाश रावते, रोशन भोरे, मेहुल उंबरकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावका. मुलींमध्ये भारती बारगा, निर्मला कोंब, रंजना बोंड यांनी प्रथम, द्वितीय अन् तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या गटात शैलेश गांगोडा, विशाल पारधी, हार्दिक वडलीया यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. मुलींमध्ये दृवी वडलिया, भूमिका भोये, प्रणिता मेघा यांनी पारितोषिक पटकावले. ४५ वर्षांवरील पुरुष गटात अनिल पवार, धीरेन ठाकूर, वीरेंद्र पाटील हे विजेते ठरले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी चंद्रकांत घोरखणा, कमलेश राबड, कल्पेश दळवी, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.