भूमिपुत्र एकत्र आल्यास क्रांती घडेल
विरार, ता. ३ (बातमीदार) : वसईला आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलन करण्यात आपण सरस आहोत; पण निवडणुकीच्या राजकारणात कमी पडतो. पिण्याचे पाणी, वीज, परिवहन, पूर आदी प्रश्नाने नागरिक ग्रासलेले आहेत. लोकांचे राजकीय पक्षावर प्रेम असते, ते योग्यही आहे; परंतु राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेताना समस्यांबाबत नेत्यांना जाब विचारण्यास घाबरतो. वसईतील भूमिपुत्र पक्ष, संघटना, मतभेद बाजूला ठेवून एका धेयाने एकत्र आले, तर वसईत सामाजिक व राजकीय क्रांती घडवू शकतो, असे मत शिक्षणतज्ज्ञ फादर जो आल्मेडा यांनी निर्मळ येथील समाज सेवा मंडळ हॉलमध्ये आयोजित सभेत व्यक्त केले.
वसई-विरार भागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही. वसई किनारपट्टी भाग असल्याने वीज खांब गंजल्याने पावसाळ्यात तारा पडून नागरिक मृत्युमुखी पडतात. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित असतो. अनियोजित परिवहन सेवेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. वसईतील रस्ते व रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वसईचे अयोग्य नियोजन व अनधिकृत बांधकामांमुळे वसई सातत्याने पाण्यात बुडत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत सर्व मतभेद बाजूला ठेवून वसईकर जागृत नागरिक संघटना बॅनरखाली एकत्र येण्यास तयार असल्याचे मत काँग्रेसचे नेते विजय पाटील, ओनील आल्मेडा, समीर वर्तक, जन आंदोलनाचे डॉमनिका डाबरे, ‘आप’चे जॉन परेरा, पर्यावरण कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.