

ओंदे गावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम
विक्रमगड (बातमीदार) : ओंदे येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ओंदे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत गावाची स्वच्छता करण्यात आली. प्रथम उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. ओंदे गावात रॅली काढून स्वच्छतेबाबत घोषणा देऊन नागरिकांचे प्रबोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. चेतना पाटील, डॉ. विनोद सोनवणे, डॉ. सुनिलदत्त गोडसे, सरपंच स्वप्नील गोविंद, उपसरपंच निवेदिता पाटील, ग्रामसेविका रक्षा पाटील आणि ग्रामस्थ यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता.
---
वाणगावमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहीम
बोईसर (बातमीदार) : बोईसर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव येथे रविवारी (ता. १) ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि वाणगाव पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून सोनचाफ्याचे झाड देण्यात आले असून ते पोलिस ठाणे परिसरात लावण्यात आले. तसेच पोलिस ठाणे आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छत्तेबाबत जनजागृती करण्याकरिता परिसरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंदन बंजारा, योगेश तुंबडे, मीनल सावे, बापू मासुळे आदी उपस्थित होते.
---
आसनगाव येथे स्वच्छ भारत अभियान
वाणगाव (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगाव ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्रमदान कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी श्रमदान केले. आसनगाव ग्रामपंचायत परिसरामधील नागरिकांनी एक तास श्रमदान करून ओला-सुका कचरा व प्लास्टिक जमा केले. त्यानंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सरपंच नीलिमा कोरे, उपसरपंच संध्या दांडेकर, पंचायत समिती सदस्य भुनेश गोलीम, आरोग्य उपकेंद्र वर्ग, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.