लोकसभा निवडणुकीचे पनवेलमध्ये वारे

लोकसभा निवडणुकीचे पनवेलमध्ये वारे

Published on

पनवेल, ता. ९ (बातमीदार)ः भाजपच्या लोकसभा महाविजय २०२४ अभियानांतर्गत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती आखण्यात येत आहे. याच अनुषंगाने पनवेलमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (ता. ९) एका पत्रकार परिषदेतून दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीकरिता देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर ४०० पेक्षा जास्त; तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने आखले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदार संघात बुधवार (ता. ११) संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यासाठीचा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात पक्षाची माहिती ध्येयधोरणे बुथमधील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी एका प्रमुख पदाधिकाऱ्याकडे विधानसभा मतदार संघातील तीन ते चार बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची बैठक स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेणार आहेत. या वेळी निवडणुकीत मतदान होईपर्यंत तसेच बुथवर ५१ टक्क्यांचे गणित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत.
---------------------------------------
संपर्क अभियानाची जय्यत तयारी
देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकहिताच्या विविध योजना अमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील तीनही विधानसभा मतदार संघांत ‘घर घर चलो’ अभियान व ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबवण्यात येणार आहे. या संपर्क अभियानात प्रदेशाध्यक्षांसोबत तीनही विधानसभेतील हजारो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते पनवेलमधील काही कुटुंबांच्या भेटी घेणार असून या दौऱ्याची पनवेलमध्ये तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com