उल्हासनगरात शॉर्ट सर्किटमुळे तळमजला पेटला,

उल्हासनगरात शॉर्ट सर्किटमुळे तळमजला पेटला,

तळ मजल्यावर लागलेल्या
आगीत १२ दुचाकी खाक
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : कॅम्प नंबर ३ येथील पवई चौकातील ‘हरी दर्शन’ या सहा मजली इमारतीच्या तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मीटर बॉक्सला आग लागली. तेथे असलेल्या वायरींनी पेट घेतल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. यात तेथे उभ्या असलेल्या १२ दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीचा धूर सहाव्‍या मजल्यावर पोहोचला होता. या दुर्घटनेमुळे काही वेळ रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून १५ मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळवल्याने रहिवाशांचा जीव भांड्यात पडला. मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हेही घटनास्थळी उपस्थित होते. धूर ओसरल्यानंतर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रहिवासी बाहेर पडले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com