सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून हल्ला तलवार, कुऱ्हाड ने दहशत-गाड्यांची तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्हा !

सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून हल्ला तलवार, कुऱ्हाड ने दहशत-गाड्यांची तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्हा !

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : गुंडप्रवृत्तीच्या मित्रासोबत संबंध तोडल्याने टोळक्याने एका मुलाच्या घरावर तलवार, कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे अडीच्या सुमारास चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या वेळी लोकांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. रेखा नितीन घाडगे यांच्या तक्रारीनुसार आरोपी गौरव मिसाळ ऊर्फ कोयता, शिवा ऊर्फ बादल आणि अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
घाडगे या कोकणीपाडा येथे रौनक पार्कमधील कोकणीपाडा यादव तबेला चाळ परिसरात राहतात. त्यांचा मुलगा प्रेम ऊर्फ पाक हा एका आश्रमात जेवण बनविण्याचे काम करतो. प्रेम याने गौरव याच्यासोबत वादावादी झाल्याने संबंध तोडले होते. याच रागातून गौरव, शिवा आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराने हातात तलवार, कुऱ्हाड घेऊन तक्रारदाराच्या घरावर हल्ला करून प्रेम याला मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी कुऱ्हाडीने दरवाजाही तोडला. त्यानंतर या टोळक्याने जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तेथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चितळसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com