तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १५) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी -चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर रविवारी दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे- कल्याण पाचव्या, सहाव्या मार्गिकेवर
कधी : मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील; तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्स्प्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहचतील.

हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील; तर पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील; तर काही लोकल सेवा रद्द असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com