Dust control contract at Shivaji Park grounds cancelled uddhav thackeray politics mumbai
Dust control contract at Shivaji Park grounds cancelled uddhav thackeray politics mumbaiesakal

Uddhav Thackeray: शिवाजी पार्कवरील मेळाव्याची दणक्यात तयारी सुरू

Uddhav Thackeray: शिवाजी पार्कसह दादर, प्रभादेवी, दादर टीटी, परळ या भागात शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचे भव्य होर्डिंग, बॅनर्स, झेंडे लावत वातावरण निर्मिती केली जात आहे. या कामी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मेळावा अतिविराट करण्यासाठी पूर्ण ताकद लावत असल्याचे समजते.

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची गर्दी जमवण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्हा प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे; तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ज्या प्रमाणे शिवाजी पार्कवर झाला त्याच धर्तीवर यंदाचा दसरा मेळावा भरवण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. राज्याच्या विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी पाच ते सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दिली.

शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंचाच आवाज शिवाजी पार्कवर घुमणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. शिवसेना ठाकरे गटाला अखेर परवानगी मिळाल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. आता शिवसेना शिवाजी पार्कवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीला लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com