डोंबिवलीत शिक्षिकेकडून 
विद्यार्थ्यांना जबर मारहाण

डोंबिवलीत शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना जबर मारहाण

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १३ : डोंबिवलीमधील स. ह. जोंधळे शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गणित येत नसल्यामुळे बेदम मारहाण केल्याचा आरोप करून पालकांनी शुक्रवारी शाळेत गोंधळ घातला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी शाळेत जाऊन प्रशासनास जाब विचारला. शाळेच्या मुख्याध्यापिका मेनन यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

डोंबिवली पश्चिमेतील स. ह. जोंधळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणिताच्या शिक्षिका नीलम भारमल यांनी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. यामध्ये मुलांच्या मानेला, हाताला मार लागला आहे. मुलांना मारहाण केल्याने संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेत गोंधळ घातला. शाळेच्या मुख्याध्यापिका मेनन यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या मारून शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी या शिक्षिकेची कोणतीही कागदपत्रे शाळेत नसल्याची बाब उघड झाली. काही दिवसांपूर्वीच या शिक्षिकेची भरती झाली असून कोणतीही प्रक्रिया पार न पाडता असे शिक्षक शाळेत भरती केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. शाळेतील गोंधळाची परिस्थिती पाहता विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शाळेत जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com