‘माझा प्रभाग म्हणजे माझे घरच’: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशीष दामले

‘माझा प्रभाग म्हणजे माझे घरच’: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशीष दामले

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : ‘ज्या प्रभागातून मला नेहमी आदर, प्रेम, आपुलकीची भावना मिळते आणि प्रभागातील प्रश्न प्रशासनात जाऊन मांडण्याची संधी मला देणारे प्रभागातील नागरिक आणि प्रभाग म्हणजे माझे घरच आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी व्यक्त केली. गेल्या १३ वर्षांपासून दसऱ्याच्या निमित्ताने आदल्या दिवशी रात्रीपासूनच प्रभागातील रस्त्यांवर रांगोळी, फूल माळा लावून दामले हे दसरा सण साजरा करतात.

यंदादेखील ही परंपरा पाळत त्यांनी सहकाऱ्यांसमवेत बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरातील संपूर्ण प्रभाग दसऱ्याच्या निमित्ताने सजवला आहे. यासाठी प्रभागाची संपूर्ण स्वच्छता करत, प्रभागातील रस्त्यांवर रांगोळी, चौकाचौकात फुलांच्या माळा यांनी प्रभाग सुंदर सजवला आहे. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो, तसेच प्रभागसुद्धा मी माझे घरच मी समजतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मी प्रभागात सजावट करून येथील नागरिकांसमवेत दसरा सण साजरा करतो, असे दामले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com