

वाशी : नवरात्रीतील नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरण नवी मुंबईत पहावयास मिळाले. नऊ दिवसांच्या उत्साहानंतर विजयादशमीच्या दिवशी दुपारनंतर देवीचे विसर्जन करण्यात आले. यात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांबरोबर घरगुती घटांचे विसर्जन करताना ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
नवी मुंबईत घरगुती, सोसायट्या, लहान आणि मोठ्या नवरात्री मंडळाच्या मिरवणुकांनी ठाणे-बेलापूर मार्ग, ऐरोली, दिद्या, कोपरखैरणे, बेलापूरमधील अंतर्गत रस्ते देवी भक्तांनी व्यापले होते. नवी मुंबई शहरात पालिकेने २३ ठिकाणांवर विर्सजनाची व्यवस्था केली होती. देवीची विलोभनीय रूपे पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी झाली होती.
यावेळी विसर्जन सोहळा निर्विघ्न होण्यासाठी ठिकठिकाणी नवी मुंबई पोलिसांकडून तसेच महापालिकेकडून विर्सजन घाटांवर यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यावेळी नवी मुंबईतील वाशी येथील सागर विहार, ऐरोली, दिवाळे गाव, सानपाडा, बामणगवळी घाट तसेच बेलापूर विभागातील पाच तलाव, नेरुळ विभागातील दोन, वाशी विभागातील तीन, तुर्भे विभागातील दोन, कोपरखैरणे विभागातील तीन, घणसोली विभागातील चार, ऐरोली विभागातील तीन, दिद्या विभागातील एक अशा २३ तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली होती.
ढोल ताशांचा गजर... फुलांची उधळण ... जय भवानी...जय अंबेच्या घोषात देवीचे विर्सजन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये महिला, मुले, मुली आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा झेंडूचे फुले स्वस्त असल्यामुळे देवीवर फुलांची उधळण करण्यात येत हातगाडी, टेम्पो, ट्रक आदी वाहनांवर बसवून देवीची मिरवणूक काढली. यावेळी फुलांची आकर्षक आरासही अनेक मंडळानी केली होती. विर्सजन घाटाच्या ठिकाणी स्वच्छ आणि इतर स्वयंसेवी संघटनांच्या वतीने निर्माल्य टाकण्यासाठी सोय करण्यात आली होती.
नवी मुंबईपालिकेच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती करण्यात येऊन कचरा वेगळा टाकण्याचे सूचित करण्यात ढोल-ताशांच्या तालावर अनेक जण या मिरवणुकीच्या आनंदात मिसळल्याचे चित्र दिसत होते. ढोल पथकात महिलांचा मोठा सहभाग आकर्षणाचा भाग ठरत होता. महापालिकेच्या वतीने देवीच्या विर्सजनासाठी विशेष व्यवस्था तैनात करण्यात आली होती. गणेश घाटावर सुरक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आले होते. तर अग्निशामक दलाचे पथकांसह बीट मार्शलही तैनात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.