संपामुळे जव्हारमधील आरोग्य व्यवस्थेची आबाळ

संपामुळे जव्हारमधील आरोग्य व्यवस्थेची आबाळ

Published on

जव्हार, ता. ३ (बातमीदार) ः राज्यातील आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आपल्याला शासन सेवेमध्ये समायोजित करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार येथे शीघ्र बाल उपचार केंद्र कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत. शासन स्तरावरून त्यांच्या समायोजनाबाबत जोपर्यंत लेखी आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन हे मागे घेणार नाही, असे कर्मचाऱ्यांकडून आले. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेची आबाळ सुरू आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सर्व राज्यभर आंदोलन सुरू आहे. जव्हार व डहाणू येथील शीघ्र बाल उपचार केंद्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी देखील पूर्णपणे संपात सहभागी आहेत. जव्हार तालुक्यातील आरोग्य व्यवस्था ही पूर्णतः कंत्राटी कर्मचऱ्यांवरच अवलंबून आहे. या यंत्रणेची अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच येथील काम अवलंबून आहे. या आंदोलनात २० वैद्यकीय अधिकारी, १५० नर्सेस व इतर २०० असे एकूण ३७० अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य सेवा पुरती कोलमडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.