मध्य आज, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

मध्य आज, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

Published on

मुंबई, ता. ३ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुख्य मार्गावर उद्या (ता. ४) रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : भायखळा ते माटुंगा, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते पहाटे ४.४५
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील फलाट क्र. तीनवर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल/एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर स्थानकातील फलाट एकवर दोनदा थांबा देण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी : रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक सुरू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.