दिवाळीत मेट्रोची वेळ वाढवा : लोढा

दिवाळीत मेट्रोची वेळ वाढवा : लोढा

Published on

मुंबई, ता. ३ : दिवाळीत मेट्रो रेल्वेच्या फेऱ्यांची वेळ वाढवण्याची मागणी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे. सध्या मुंबई उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक सुरू सून, ५ नोव्हेंबरपर्यंत बऱ्याच लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोढा यांनी ही मागणी केली आहे. उपनगरीय रेल्वे रुळांच्या दुरुस्तीकामामुळे मुंबई उपनगरात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे ऐन दिवाळीत ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यानही प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने या तारखांदरम्यान मेट्रो फेऱ्यांची वेळ रात्री १० ऐवजी रात्री १२ पर्यंत वाढवावी, अशी विनंती लोढा यांनी केली आहे. एमएमआरडीएने नवरात्रोत्सवात मेट्रो रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या वाढवली होती आणि त्यातून मेट्रोला नफा झाला होता, याकडेही लोढा यांनी लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.