ऊर्फी जावेद विरोधात गुन्हा दाखल

ऊर्फी जावेद विरोधात गुन्हा दाखल

Published on

मुंबई, ता. ३ : ऊर्फी जावेदविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उर्फीचा अश्लीलता प्रकरणात अटक केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ खरा नसून पोलिस गणवेशाचा गैरवापर करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी व्हिडीओमध्ये सहभागी असलेल्यांविरूद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना व्हिडीओमधील तोतया पोलिस निरीक्षकही अटकेत असून संबंधित वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी येत्या दिवसांत ओशिवरा पोलिस ऊर्फी जावेदची चौकशी करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.