पशुपालन व्यवसाय वृद्धीसाठी मदतीचा हात

पशुपालन व्यवसाय वृद्धीसाठी मदतीचा हात
Published on

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : पशुपालन, दूध उत्पादन तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी ७५ टक्के आणि ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन पशुपालकांना करण्यात आले आहे. या योजनांचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ डिसेंबरपर्यंत आहे.

राज्यस्तरीय, नावीन्यपूर्ण योजनांतर्गत दोन दुधाळ संकरित किंवा देशी गायी, म्हशींच्या खरेदीसाठी अर्थसाह्य, अंशतः ठाणबंद दहा शेळी व एक बोकड गट वाटप करणे, हजार मांसल कुक्कुट पक्षीगृह, बांधकाम व पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय करणे अशा प्रकारच्या योजनांचा यात समावेश आहे; तर जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ संकरित किंवा देशी गायी म्हशींच्या खरेदीस अर्थसाह्य अंशतः ठाणबंद दहा शेळी व एक बोकड गट वाटप करणे, १०० एकदिवसीय कुकुट पक्षी खरेदीला अर्थसाह्य या योजना आहेत.

योजनांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने www.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरवर AH-MAHABMS या ॲपवर भरता येणार आहेत. तसेच पात्र अर्ज पुढील ५ वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. योजनेसंबंधी अधिक माहितीकरिता पशुपालकांनी जिल्ह्यातील नजीकच्या तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com