हमाल नसल्याने बूट पॉलिश करणारे मदतीला

हमाल नसल्याने बूट पॉलिश करणारे मदतीला

दिवा, ता. २३ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मार्गावरील दिवा स्थानकात अधिकृत हमाल नसल्याने तेथे बूट पॉलिश करणाऱ्यांनाच रेल्वेचे साहित्य कमी मोबदल्यात उचलण्याची नामुष्की ओढावली आहे. शिवाय जखमी प्रवाशांनाही बूट पॉलिश करणाऱ्या वक्तीच मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
दिवा जंक्शनवर मध्य रेल्वेच्या लोकल आणि दिवा-वसई, दिवा-पनवेल, दिवा-रोहा, दिवा-सावंतवाडी, दिवा-पेण, दिवा-रत्नागिरी अशा विविध मार्गांनी गाड्या येत-जात असतात. पूर्वी फाटक सुरू असताना दररोज अपघात होऊन नागरिक जखमी अथवा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यांना उचलण्यासाठीही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अधिकृत हमाल नसल्याने बूट पॉलिश करणाऱ्यांनाच स्ट्रेचर घेऊन जावे लागत असे. तसेच रेल्वेचे कोणतेही साहित्य आल्यास बूट पॉलिश करणाऱ्यांना स्वतःचे काम बंद ठेवून ते सामान दिवा स्थानक कार्यालयात पोहचवावे लागते. त्यासाठी त्यांना कधी मोबदला मिळतो; तर कधी तो मिळतही नाही. आताही दिवा स्थानकावर प्रवासी जखमी झाल्यास वा प्रवाशाला चक्कर आल्यास त्याला उचलण्यासाठी बूट पॉलिश करणाऱ्यांना बोलवावे लागते. हमालांची गरज लक्षात घेता रेल्वेने लवकरात लवकर अधिकृत हमाल नेमावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

---------------

दिवा रेल्वे स्थानकात हमाल नसल्याने अपघातानंतर प्रवाशाला मदत करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास काहीच मदत करता येत नाही. रेल्वे हमालाची मागणी २०१८ पासून केली असून त्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने अजूनही हमालाची भरती झालेली नाही.
- श्रावणी गावडे, अध्यक्ष, आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com