

सरळगाव, ता. २८ (बातमीदार) : माळ पंचायत समिती गणातील रस्ते आता चकाचक होणार आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आदिवासी विभागाकडून तब्बल ४० ते ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या विविध कामांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
माळ पंचायत समिती गणात माळ ग्रामपंचायत, चासोळे, वेळुक, बुरसुंगे, शिरोशी व शेलगाव या ग्रामपंचायतींमधील गावांचा समावेश आहे. या ठिकाणी काही जोडरस्ते, अंतर्गत रस्त्यांचा कायापालट होणार आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यांना निधी मिळत नसल्याने आदिवासी भागातील नागरिकांना चिखल, दगडगोटे, खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता, परंतु आमदार किसन कथोरे यांनी लक्ष घातल्याने हे रस्ते आता चकाचक होणार आहेत. त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. अजूनही या भागासाठी ५० कोटी रुपये मंजूर करून आणणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.
रखडलेल्या विविध कामांचा पाठपुरावा अनिल घरत व माजी सभापती सीमा घरत तसेच या विभागातील कार्यकर्त्यांनी कथोरे यांच्याकडे केला होता. या वेळी कथोरे यांनी माळ येथील अवनी मतिमंद मुलांच्या निवासी शाळेला भेट दिली. या भूमिपूजनासाठी भाजप नेते सुहास मोरे, माजी सभापती दीपक पवार, स्वरा चौधरी, दत्तु वाघ, अनिल घरत, सीमा घरत, अनिल वायले, गणेश कथोरे, बाजार समिती संचालक सुरेश बांगर, अशोक मोरे, जिल्हा परिषद सदस्या नंदा उघडा, विलास देशमुख, लक्ष्मण गोल्हे, प्रकाश दळवी, रमेश उघडा, गोविंद भला, गौरव घोलप यांच्यासह माळ गणातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.