संविधानाने भारतीयांना विश्वास दिला

संविधानाने भारतीयांना विश्वास दिला
Published on

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाला आत्मबलाची जाणीव करून देते, त्यात विश्वास निर्माण करते. जर कुणीही कुठेही मानवी न्यायमूल्यांची अवहेलना करत असेल, तर संविधान त्याला न्याय देऊ शकते. भारताची राज्यघटना न्याय देते. ती जात, धर्म, वर्ग, वंश, लिंग, गरिब, श्रीमंत असा भेदाभेद करत नाही, असे प्रा. राजेंद्र डोंगरदिवे यांनी संविधान ग्रंथाचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना म्हटले.

संविधान दिनानिमित्ताने बी. एन. एन. महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी संविधान ग्रंथात असलेल्या पंचसूत्रीवर डॉ. राजेंद्र डोंगरदिवे यांनी संविधानातील बावीस उपभागांचे वर्गीकरण, त्यात असलेली कलमे, त्यांचे महत्त्व आणि बारा अनुसूचींचे वेगळेपण स्पष्ट केले. हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वशील बुद्धिसामर्थ्याचा अलौकिक ठेवा आहे. मसुदा समितीचे प्रमुख म्हणून प्रत्येक कलमाचा ड्राफ्ट तयार करून त्यातील सुसूत्रता अधोरेखित केली आहे. ही जगातील सर्वांत मोठी हस्तलिखित राज्यघटना आहे. या राज्यघटनेचे लिखाण प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी इटालियन लिपीत केले आहे.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. वाघ यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करत असतानाच संविधानाचे वाचन करणे आवश्यक आहे. त्याद्वारे समाजातील बंधुभाव जोपासला पाहिजे. राष्ट्रीय मूल्ये आत्मसात केली पाहिजेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. संजय सोनावणे यांनी केले; तर आभार प्रा. बी. के. पाईकराव यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस, एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com