हवेतील गारव्याने थंडीचे संकेत

हवेतील गारव्याने थंडीचे संकेत
Published on

तुर्भे, ता.२८ (बातमीदार): अवकाळी पावसामुळे हवेतील गारवा अधिकच वाढला आहे. तीन दिवसांपासून वातावरणातील बदलांना नवी मुंबईकर सामोरे जात आहेत. मात्र, अजूनही शहरात हुडहुडी भरवणारी कडाक्‍याची थंडी जाणवत नसली तरी हवेतील गारव्याने थंडीची चाहूल मात्र जाणवू लागली आहे. त्यामुळे परप्रांतातील स्वेटर विक्रेते शहरात दाखल झाले आहेत.
दिवाळीत थंडी फारशी जाणवलीच नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी ही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीशिवाय झाली. त्यात हवामानात सतत बदल होत असल्याने यंदा थंडी पडणार की नाही, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. मात्र, आठवड्याभरापासून थंडीची चाहूल मात्र लागली आहे. शहरात सध्या दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्याने रस्त्यांवर लोकरीचे कपडे विकणारे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तरप्रदेश, गोंडा, बस्ती येथील स्वेटर विक्रते दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे लोकरीच्या स्वेटरबरोबर पुलओव्हर, जर्किन, जॅकेट त्याचबरोबर बटन्सच्या स्वेटरलाही विशेष मागणी आहे. तसेच जर्किन, जॅकेट आणि मिंकचे फ्रंट ओपन कोट खरेदीसाठी गर्दी होत आहे.
----------------------------------------------
स्वस्त आणि मस्त पर्याय
लहान मुलांचे स्वेटर १५० ते ७०० रुपये, पुरुषांचे साधे स्वेटर २५० ते ८५० रुपये, फॅशनेबल स्वेटर ३०० ते ९०० रुपये, जॅकेट ४०० ते १२०० रुपये, महिलांचे साधे स्वेटर ३०० ते ७०० रुपये, फॅशनेबल स्वेटर ३०० ते १५०० रुपये, गोनम कोरियन २५० ते ५५० रुपये, कानटोप्या ५० ते १५० रुपये, हातमोजे १०० ते ४०० रुपये, कानपट्टी ५० ते १०० रुपये, मफलर ५० ते ३०० रुपयांना उपलब्ध आहे.
------------------------------------------
दिवाळी संपली की उबदार कपड्यांची खरेदी सुरू होते. त्यामुळे ऑगस्टमध्येच दिल्ली आणि लुधियाना येथून ऊबदार कपडे मागवले जातात. सध्या वाहनधारकांकडून कानटोपी, मफलर, हातमोजे, स्वेटरला मागणी आहे.
- रामलाल प्यारे, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com