अखेर म्हसळा बायपास मार्ग खुला

अखेर म्हसळा बायपास मार्ग खुला
Published on

श्रीवर्धन, ता. २८ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील माणगाव-म्हसळा-दिघी पोर्ट या राष्ट्रीय मार्गावरील सकलप बायपास रस्त्याचे उद्‍घाटन नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे आता म्हसळा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाल्याने येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
कित्येक वर्ष प्रलंबित असलेला आणि दिघी पोर्टच्या वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग म्हसळा बायपास मार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बनवला आहे. हा रस्ता सुरू झाल्याने दिघी पोर्टमधील २४ तास वाहतूक सुरू राहण्याची शक्यता आहे. दिघी पोर्टमधून महाड, रोहा, चिपळूण, लोटे, तळोजा, सोलापूर अशा औद्योगिक क्षेत्रात दगडी कोळसा, रॉक फॉस्फेट, डांबर, इथेनॉल, कॉईल इत्यादी वाहतूक होऊ शकेल. सलग मालवाहतूक झाल्यास दिघी पोर्ट व श्रीवर्धन, म्हसळ्यात अनेक पोर्टवर अवलंबून राहणारे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. याशिवाय, येथील तरुणांनाही नोकऱ्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हसळा बायपास रस्त्यासाठी साडेतेरा कोटी खर्च झाला आहे. साधारण दीड किलोमीटर रस्त्यामुळे भविष्यात या भागातील आर्थिक व व्यापार उन्नती निश्चितच होईल.
- अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र

दिशादर्शक फलकांचा अभाव
म्हसळ्यावरून दिवेआगरकडे जाण्यासाठी किंवा श्रीवर्धनमार्गे बायपास जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक अद्याप लावलेले नाही. त्यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com