

मनोर, ता. २८ (बातमीदार) : ऑक्टोबरमध्ये मनोर-वाडा रस्त्यावरील टेन गावच्या जमिनींवर बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्नाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या वेळी भूमाफियांच्या गुंडांनी शेतकऱ्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जमिनी बळकावण्यासाठी दहशत निर्माण करणारी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी टेन गावातील ग्रामस्थांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केली आहे.
१८ ऑक्टोबर २०२३ रोजी गुलशन तासे आणि तिच्या गुंडांनी टेन गावातील जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. विरोध करणारे जबी राऊत, इम्तियाज आवारी, सलीम बुबेरे, बिलाल आवारी यांना जबर मारहाण करून चाकूने भोसकण्यात आले होते. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फरार असलेली संशयित महिला आणि तिच्या हस्तकांकडून टेन गावातील ग्रामस्थांना धमक्या दिल्या जात आहेत. टेनच्या ग्रामस्थांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत पालघरच्या पोलिस अधीक्षकांना १९ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती, परंतु पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाईची मागणी टेनच्या ग्रामस्थांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्याकडे केली आहे.
४० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद
गुलशन तासे आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तासे हिच्याविरोधात काशी-मिरा आणि मनोर पोलिस ठाण्यात सुमारे ४० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने जानेवारीमध्ये तिला मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.