

खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघरमधील कोपरा बस थांब्यालगत असलेल्या निरसूख पॅलेस हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण बांधकाम विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. २८) त्यावर तोडक कारवाई करण्यात आली.
खारघर सेक्टर दहा कोपरागाव बस थांब्यालगत सिडकोच्या जागेवर निरसूख हॉटेलच्या जागामालकांकडून विनापरवाना बांधकाम केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. सिडकोने केलेल्या पाहणीत हॉटेलच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. या बांधकामावर सिडकोने तोडक कारवाई केली. त्यानंतर हॉटेललगत असलेला भंगार विक्रेता आणि खारघरमधील सिडकोच्या अन्य जागेवर असलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. याप्रसंगी सिडकोचे पथक, पोलिसांचा मोठा फौजफाटा, जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले होते. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खारघर परिसरात जवळपास सिडकोच्या ४८ पेक्षा जास्त भूखंडावर भूमाफियांनी कब्जा केला आहे. सिडकोची मोहीम थंडावल्याने शहरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.