

दिवा, ता. २८ (बातमीदार) : मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेत प्रशासनाकडून फेरीवाल्यांना परवानगी देण्याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात प्रवास करत असताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकलमध्ये प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यंत प्रवाशांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यातच फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी रेल्वेकडे प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.