विद्यार्थी रमले टॉय लायब्ररीत

विद्यार्थी रमले टॉय लायब्ररीत
Published on

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) : मनोरंजनासोबत विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढणारी टॉय लायब्ररी अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात सुरू करण्यात आली आहे. चिल्ड्रन टॉय फाऊंडेशनच्या माध्यमातून १९८४ पासून कार्यरत असलेल्या संस्थेमार्फत देशभरातील ३६ राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाला टॉय लायब्ररीचा मान मिळाला आहे. आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, गणिती, शैक्षणिक क्षमता वाढवणारे १४० वैविध्यपूर्ण खेळ लायब्ररीत समाविष्ट आहेत. या टॉय लायब्ररीचे शाळेत नुकतेच मुख्याध्यापक संतोष भणगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

खेळातून ज्ञानाची व्याप्ती वाढेल, सर्जनशील उपक्रमांना चालना मिळेल, काही कालावधीनंतर विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातील, विजयी विद्यार्थ्यांना नामांकने देण्यात येतील, अशी माहिती मुख्याध्यापक भणगे यांनी दिली. यासाठी शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी संस्थेचे पदाधिकारी अशोक कुलकर्णी, भगवान चक्रदेव, दीपक चव्हाण, नरेंद्र कुलकर्णी, नयना गुळीक, मेधा गोखले, प्रशांत बुटेरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com