रामपूरमधील पादचाऱ्यांची वाट बिकट

रामपूरमधील पादचाऱ्यांची वाट बिकट
Published on

बोर्डी, ता. २८ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान दक्षिणेकडे असलेले रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून दिल्यामुळे वाहन चालकांची सोय झाली आहे. मात्र वाटसरूंसाठी वाट बिकट झाली आहे, अशी रामपूरमधील नागरिकांनी व्यक्त केली.

उड्डाणपूल बांधताना काही त्रुटी असल्यामुळे पादचाऱ्यांसाठी वाट बिकट झाली आहे. घोलवड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा लांबीचा उड्डाणपूल आहे. रेल्वेमार्ग ओलांडताना निर्माण होणारे धोके लक्षात घेता रेल्वेने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर मार्गाच्या दुतर्फा कंपाउंड केल्यामुळे पादचाऱ्यांना सक्तीने उड्डाण पुलावरूनच प्रवास करावा लागणार आहे.

रामपूर गावातील आर्थिक व्यवहार व व्यापार पश्चिमेला असलेल्या घोलवड गावावर अवलंबून आहे. दैनंदिन खरेदी- विक्री करण्यासाठी घोलवड येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. जवळजवळ दररोजच अनेक लोकांना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणे भाग पडते. तसेच घोलवड, बोर्डी येथे शाळा व महाविद्यालय आहे. पूर्वेकडील भागात वास्तव्य करून असलेल्या विद्यार्थ्यांना देखील या उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करावे लागणार आहे. दिवसातून दोनवेळा डोंगराएवढ्या उंच उड्डाणपुलावरून आबालवृद्धांना प्रवास करणे जिकरीचे ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वेमार्गाच्या दुतर्फा उड्डाणपुलाजवळ पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र जिना, तसेच लिफ्ट ठेवणे अपेक्षित होते. मात्र वाटसरूंच्या गरजा भागविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
- जयंत माच्छी, अध्यक्ष, मानव अधिकार मंच

उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी सेवामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रेल्वे स्थानकात जाणे, तसेच बाजारहाट करण्यासाठी जाणाऱ्या वाटसरूंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
- जगदीश मळवळकर, ग्रामस्थ, घोलवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com