

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आणि शतक महोत्सवी समिती यांच्यावतीने धन्वंतरी या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर संस्थान सभा मंडपात गुरुवारी ३० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता धन्वंतरी याग होणार आहे. त्यानंतर तीन दिवसीय धन्वंतरी व्याख्यानमाला पार पडणार आहे. पहिल्या पुष्पात १ डिसेंबरला ‘हृदयरोगावर मात’ या विषयावर डॉ. विवेक महाजन आणि वैद्य महेश ठाकूर हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या पुष्पात २ डिसेंबरला ‘मनाचिये डोही आरोग्य तरंग’ या विषयावर डॉ. अद्वैत पाध्ये आणि वैद्य आशुतोष यार्दी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तिसऱ्या पुष्पात ३ डिसेंबरला संघर्ष कॅन्सरशी या विषयावर डॉ. अनिल हेरुर व वैद्य ऊर्मिला पिटकर या मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ७ वाजता वक्रतुंड सभागृह, ३०१, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.