

नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : चालत्या लोकलमध्ये चढू किंवा उतरू नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून केल्या जातात. तरीही हौशी प्रवासी जीव धोक्यात घालून चालत्या लोकलमध्ये चढणे-उतरणे करतात. अशीच एक घटना नुकतीच वसई रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहावर घडली. चालत्या लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना प्रवासी लोकल आणि फलाटामधील फटीमध्ये पडला. या वेळी कर्तव्यावर असणाऱ्या आरपीएफ जवानाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धावत जाऊन प्रवाशाचा जीव वाचवला. राजपाल यादव असे जीव वाचवणाऱ्या आरपीएफ एएसआयचे नाव आहे. राधेकृष्ण कालू गौतम (वय २१ वर्षे) असे जीव वाचवलेल्या प्रवाशाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील ललितपूर गोंडा येथील राहणारा आहे. राधेकृष्ण चालत्या लोकलमधून उतरत असताना पाय घसरून पडला असता कर्तव्यावरील आरपीएफ एएसआय राजपाल यादव यांनी आपला सहकारी राजवीर सिंगच्या मदतीने त्याला सुरक्षित अंतरावर ओढून बाहेर काढले. प्रवाशाचे प्राण वाचवल्याबद्दल त्याने आरपीएफ जवानांचे आभार मानले. हा संपूर्ण प्रकार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.