

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथे ‘एसएफए चॅम्पियनशिप’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महापालिका, बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठान आणि स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) यांच्या संयुक्तपणे येत्या १ ते ७ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा असतील. या स्पर्धेत राज्यभरातील शाळांमधून तब्बल साडेतीन हजार खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत. हे खेळाडू विविध नऊ क्रीडा प्रकारांमध्ये आपले क्रीडानैपुण्य सादर करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेद्वारे सातत्याने विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर अंधेरीतील क्रीडा संकुलात या शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत फूटबॉल, स्पीडक्युबिंग, कॅरम, टेबल टेनिस, मुष्टियुद्ध अर्थात बॉक्सिंग, तायक्वांडो, जलतरण, बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश असणार आहे, असे क्रीडा संकुलाचे विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे यांनी सांगितले.
...
वेळापत्रक असे
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ डिसेंबरला मुष्टियुद्ध (बॉक्सिंग), स्पीडक्युबिंग, कॅरम, टेबल टेनिस आणि तायक्वांडो या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. २ डिसेंबरला नेमबाजी अर्थात शूटिंग, ३ डिसेंबरला बुद्धिबळ, ४ डिसेंबरला जलतरण आणि ५ डिसेंबरला बॅडमिंटनच्या स्पर्धा होणार आहेत. सामन्यांची अद्ययावत माहिती आणि शालेय लीडरबोर्डसाठी www.sfaplay.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.