‘अग्निवीर’ प्रशिक्षणार्थी तरुणीची आत्महत्या

‘अग्निवीर’ प्रशिक्षणार्थी तरुणीची आत्महत्या
Published on

अंधेरी, ता. २८ (बातमीदार) : ‘अग्निवीर’च्या प्रशिक्षणासाठी आलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीने सोमवारी सकाळी ‘आयएनएस हमला’वर गळफास लावून आत्महत्या केली. अपर्णा नायर असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेने अपर्णाच्या सहकारी तरुणींमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकलेला नाही. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांच्या जबानीनंतर या घटनेमागील कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अपर्णा ही मूळची केरळची रहिवासी असून तिची अग्निवीरसाठी निवड झाली होती. त्यामुळे ती आठ दिवसांपूर्वीच प्रशिक्षणासाठी केरळहून मुंबईत आली होती. सध्या ती मालाडच्या मालवणीतील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’वर महिलांच्या वसतिगृहात राहत होती. तिच्यासोबत इतर दहा ते पंधरा सहकारी महिला राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी तिच्या प्रियकराचा तिला फोन आला होता. त्या वेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर ती प्रचंड मानसिक तणावात होती. तिने कुटुंबीयांशी फोनवरून चर्चा केली होती.
...
चादरीच्या साह्याने गळफास
सोमवारी सकाळी एक मैत्रीण तिला भेटायला गेली असता तिने दरवाजा उघडला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिथे उपस्थित अधिकाऱ्‍यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. या वेळी त्यांना अपर्णाने चादरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिला आयएनएसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com