

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : बोरिवलीमधील ६५ वर्षीय महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून राहुल बजाज, डॉक्टर पटेल व त्यांचा सहायक इम्रान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच वडाळ्यातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. यामध्ये मोहम्मद शेरु शेख मकसुद खाँ ऊर्फ डॉ. आर. पटेल, मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ, मोहम्मद आसिफ मोह. निसार व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात वडाळ्यातील पीडित तक्रारदार राजेश पाटील यांना एका आजारावर खात्रीशीर उपचार करून त्यांना तात्काळ बरे करण्याचे प्रलोभन या टोळीने दाखवले होते. त्यानंतर पाटील यांच्या वडाळा येथील निवासस्थानी येऊन आरोपी पटेल व त्याच्या सहायकाने तपासणी केली. त्या वेळी पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगत त्यामुळे पीडितेचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपचार करत असल्याचे भासवून त्यांच्याकडून १४.५० लाख रुपये उकळले होते. दरम्यान, बनावट डॉक्टरांच्या या टोळीने फसवणूक केलेल्या आणखी २ तक्रारदारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.