एसआरएच्या तोडक कारवाईला स्थानिकांचा विरोध

एसआरएच्या तोडक कारवाईला स्थानिकांचा विरोध
Published on

मालाड, ता. २८ (बातमीदार) : कांचपाडा नंबर- १ येथे ‘एसआरए’ आणि विकसकाकडून करण्यात येणाऱ्या तोडक कारवाईला स्थानिकांनी सोमवारी विरोध केला आहे. मालाड पश्चिमेतील काचपाडा क्रमांक १, येथे एसआरए अंतर्गत झोपटपट्टी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. सोमवारी एसआरए अधिकारी आणि विकसक येथील झोपड्या पाडण्यासाठी गेले असता त्यांना स्थानिकांनी विरोध केला. स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही तोडक कारवाई ही अनधिकृत असून या वस्तीतील ७० टक्के नागरिकांची अद्याप या पुनर्विकास प्रकल्पाला सहमती नसूनही विकसक बळजबरीने एसआरए प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा प्रकल्प राबवत आहे. या वेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी मध्यस्थी करत रहिवाशांना शांत करत अधिकाऱ्यांशी चर्चा करत तोडक कारवाई थांबवण्याची विनंती केली. दरम्यान, आमच्या सहमतीशिवाय आमच्या झोपड्या तोडू नयेत, आधी आमची संमती घ्यावी, मगच झोपड्यांना हात लावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी आरोख्य मेरी यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com