आझाद मैदानावर शेतकरी आणि कामगारांचा यल्गार

आझाद मैदानावर शेतकरी आणि कामगारांचा यल्गार
Published on

मुंबादेवी, ता. २८ (बातमीदार) : कामगारविरोधी धोरणे राबवून कामगारांचे‌ खच्चीकरण करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला‌ सत्तेवरून खाली खेचण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात सामाजिक संघटना शेतकरी, कामगार संघटना संयुक्त कृती संघटनेच्या इशारा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका करण्यात आली. या इशारा मोर्चाला इंटकप्रणित सर्व कामगार वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होत आपला आक्रोश व्यक्त केला. महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा निवडून आले; तर कामगारांची समस्या आणखीनच बिकट होईल, असे इंटक नेते गोविंदराव मोहिते यांनी या वेळी सांगितले. आज महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोविंदराव मोहिते यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com