

मुंबई, ता. २८ : चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने सर्व आरोग्य संस्था आणि रुग्णालयांना इन्फ्लूएंझा (आयएलआय), गंभीर तीव्र श्वसन संसर्ग (सारी) यांच्याशी संबंधित रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि त्यांच्याबद्दलची माहिती आयपी पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याच्या, हात धुण्याच्या आणि पीपीई किट घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच वरील आजारांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.