Maharashtra Police
Maharashtra Policeesakal

Maharashtra Police: वसईत पोलिसांची शंभर नंबरी कामगिरी; गुन्ह्यांमध्ये झाली मोठ्या प्रमाणावर घट

Mumbai Police: मिरा-भाईंदर वसई-विरार शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या १० महिन्यांत गुन्हेगारीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. खून, ठार मारण्याचा प्रयत्न, तसेच सोनसाखळी चोरीचे जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत एकूण ९९ गुन्हे घडले. नव्याने पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली व परिसरातील गुन्ह्यांचा १०० टक्के तपास करण्यात पोलिसांना यश आले. या यशस्वी कामगिरीमुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

Maharashtra Police
Police Band Competition : महाराष्ट्र पोलिस संघास दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

आपसांतील किरकोळ वाद, चारित्र्याचा संशय, व्यावसायिक भांडण, जमिनीचा वाद, तसेच किरकोळ कारणामुळे लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. पुढे कोणता परिणाम होईल, याची पर्वा न करता वेळ पडल्यास हत्या करण्यास देखील मागे-पुढे पाहत नाही. अनेक गुन्हे रागात भरात होत असल्याचे सांगण्यात येते.

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात १० महिन्यांत खून, ठार मारण्याचा प्रयत्न करणारे ६५ गुन्हे घडले आहे. २०२२ मध्ये एकूण ३६ खून, सोनसाखळी चोरीच्या ३५ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. २०२३ च्या दहा महिन्यांतील तुलना पाहता यंदा दोन खून, तर जबरी चोरीचे प्रमाण एकने कमी झाल्याचे दिसून येते. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या तपासकामाला वेग आला. त्यामुळे खून, जीवघेणे हल्ला प्रकरणी संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले

Maharashtra Police
Maharashtra Police: महाराष्ट्राला मिळणार नवे पोलिस महासंचालक!

दाटीवाटीच्या वस्तीत गुन्हेगार आश्रय घेत गुन्हे करत आहेत. अनेकदा अमली पदार्थ तस्करी व वाहतूक करताना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यातच हत्येचे प्रकार भयावह आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. अनेकदा चोरी करून चोरटे मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी पळून जातात. सोनसाखळी चोरीचे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांचा यशस्वी तपास पाहता नागरिकांत सुरक्षेची भावना निर्माण होत आहे.

Maharashtra Police
Maharashtra Police: पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाच्या अपहरणाचा डाव उधळला ; वाचा सुटकेचा थरार !

दहा महिन्यांतील गुन्हे
गुन्ह्याचा प्रकार गुन्हे उकल
खून ३४ ३४
हत्येचा प्रयत्न ३१ ३१
जबरी चोरी ३४ ३४

Maharashtra Police
Maharashtra Police: उत्कृष्ट तपासात महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही, केंद्राने जाहीर केली यादी

सोनसाखळी चोरांपासून सावध कसे रहाल :
- अनोळखी व्यक्तींसोबत बोलू नका.
- निर्जनस्थळी जाताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
- शक्यतो दागदागिने घालून एकटे फिरू नका.
- घटना घडल्यावर त्वरित नजीकच्या पोलिसांना संपर्क करा.
- मोबाईलवर बोलताना आजूबाजूला लक्ष द्या.

Maharashtra Police
Maharashtra Police : धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून महिला पोलिसावर बलात्कार; गर्भपातासाठी खायला घातल्या गोळ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com