सुंदरराव मोरे महाविद्यालयात ‘कौशल्य विकास’ मार्गदर्शन

सुंदरराव मोरे महाविद्यालयात ‘कौशल्य विकास’ मार्गदर्शन

पोलादपूर, ता. १२ (बातमीदार) : महाड येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन परिसंवाद पार पडला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व करिअर कट्टा विभागाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. घाटकोपर, मुंबई येथील विमल-वर्षा फाऊंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या फाऊंडेशनतर्फे गेल्या तीन वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात करिअर कौन्सिलिंगचे व प्लेसमेंटसाठी तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येत आहे. पदवीधर, गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष मालुसरे यांनी, पोलादपूर तालुका अजूनही दुर्गम आहे. शैक्षणिक बाबतीत विकसित झालेला नाही. तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या बाबतीत पुरेसे ज्ञान नाही. यासाठीच पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांना विविध क्षेत्रांत नोकरीची सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी नीतेश मालुसरे, हरीश शेडगे, दीपक धानवे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com