मनरेगा महासंचालकांकडून जव्हार येथे आढावा
जव्हार, ता. १७ (बातमीदार) : मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गाव-पाडे जोडरस्ते आराखडा व जलव्यवस्थापन आराखडा नियोजन करण्याबाबत जव्हार येथे आढावा बैठक घेण्यात आली. मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधासंपन्न कुटुंब मिशन राबवणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी साध्य करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी गाव-पाडे रस्तेजोडणी आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
या वेळी गावपाड्यांच्या विकासाला पूरक ठरतील, अशा योजना राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मनरेगाअंतर्गत जलव्यवस्थापन आराखडा नियोजन करून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रत्येक शेतावर पावसाचे पाणी साठवणे गरजेचे आहे. ‘हर खेत को पानी’ ही योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची गरीबी दूर होऊन तो प्रगत होईल. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना लघुपाटबंधारे विभागाला देण्यात आल्या. वन विभागाने दगडी बांधाप्रमाणे सिमेंट बंधाऱ्याची कामे घ्यावीत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ५० जलतारा, शोषखड्डे असावेत, अशी सूचना महासंचालक नंदकुमार यांनी तांत्रिक सहायक व संबंधितक विभागांना दिल्या.
याशिवाय, प्रत्येक तालुक्यांनी जलव्यवस्थापन आराखड्याप्रमाणे प्रत्येक शेताला शंभर टक्केप्रमाणे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार गावामध्ये विहिरी, शेततळे किती आहेत, याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शंभर टक्के जॉबकार्ड शंभर दिवसांप्रमाणे वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या वेळी राज्य गुणवत्ता निरीक्षक शहाडे, शिक्षक तथा राज्य प्रशिक्षक समन्वयक निलेश घुगे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

