संपामुळे कोलमडली ग्रामीण टपालसेवा

संपामुळे कोलमडली ग्रामीण टपालसेवा
Published on

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : चार दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील टपालसेवा ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील २१ शाखांमधील व्यवहार बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण डाकसेवकांच्या विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या बेमुदत संपामुळे तालुक्यातील टपाल व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद राहिल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑल इंडिया डाकसेवक युनियन व नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता. १२) देशव्यापी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात तालुक्यातील २१ शाखांमधील २४ डाकसेवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील टपालसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. १९५४ पासून सर्वसामान्य नागरिकांची विश्‍वासार्हता राखण्यात कायम यशस्वी झालेली व्यवस्था म्हणून ग्रामीण भागात टपाल विभागाकडे पाहिले जाते. शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामीण डाक सेवकांनी शासनाच्या विरोधात बेमुदत संप पुकारला आहे.

--------------
वेळ व पैशांचा अपव्यय
दैनंदिन टपाल देवाण-घेवाण, आवृत्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना, मनी ऑर्डर, आधार कार्ड, पॅन कार्ड, रजिस्ट्री, न्यायालयीन व बँकेच्या नोटिसा, विविध प्रकारचे कार्ड, बँकिंग व्यवहार तसेच विविध योजनांच्या लाभांसाठी काढण्यात येणारे खाते यासह अनेक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे टपाल ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे वेळ, पैसा व गैरसोयींचा सामना करावा लागला.

----------
जव्हार टपाल कार्यालयात आर्थिक व्यवहारासंबंधी कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील खातेधारकांचीही कामे होऊ शकतील.
- उमेश झाटे, पोस्ट मास्तर, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com