Bhiwandi Road
Bhiwandi Roadsakal

Bhivandi Railway: भिवंडी-वसई मार्गावर नोकरदारांचे हाल

Published on

भिवंडी, वसईदरम्यान नियमित कामावर जाण्यासाठी नोकरदार लोकल सेवेला प्राधान्य देतात; मात्र प्रवाशांच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या जास्त नसल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. परिणामी, दिवा-वसई मार्गावर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेमध्ये जादा लोकल सोडाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भिवंडीतून मुंबई-ठाणे आणि दिवा, कोपर, पनवेल या मार्गावरील रेल्वे स्थानकांतून भिवंडी व वसई येथे जाणाऱ्या कामगारवर्गाची संख्या मोठी आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत लोकल व मेमूच्या फेऱ्या निवडक असल्याने गाडीमध्ये गर्दी झाल्याने नोकरदारांचे हाल होतात. प्रवासी गाडीतून बाहेर पडून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रेल्वे प्रशासन लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी विविध सूचना देत आहेत. त्यामुळे या रेल्वे प्रशासनाने दिवा-वसई मार्गाकडेदेखील लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Bhiwandi Road
Bhivandi: मतदारसंघ कोणाच्याही नावावर नसतो; सुषमा अंधारेंचा कपिल पाटलांवर निशाणा

दोन फेऱ्या वाढवण्याची गरज
मध्य रेल्वे स्थानकातील प्रवाशांना पश्चिम रेल्वे स्थानकांकडे जाण्यासाठी दिवा-वसई मार्गावर जास्त लोकल नाहीत. कर्जत, कसारा आणि डोंबिवली परिसरातील प्रवाशांना दादरमार्गे प्रवास करून पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवरील इच्छित स्थळी जावे लागते. त्यामुळे वेळ वाया जाऊन त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे सकाळी आठ ते सव्वाआठ आणि नऊ ते सव्वानऊ या वेळेत दिवा रेल्वे स्थानकातून दोन लोकल वसईसाठी सोडण्यात याव्यात, अशी मागणी नियमित जाणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे.

Bhiwandi Road
Bhiwandi Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

चार तास प्रवासी ताटकळत
कोपर रेल्वे स्थानकातून सकाळी ५.५० वाजता वसईकडे जाणारी पहिली लोकल गेल्यानंतर थेट चार तासांनी सकाळी सव्वादहा वाजता गाडी आहे. दरम्यानच्या चार तासांच्या वेळेत दिवा व पनवेल या स्थानकांतून एकही लोकल नाही. त्यामुळे जादा फेऱ्यांच्या मागणीने जोर धरला आहे.

भिवंडी-वसई मार्गावर कमी फेऱ्या आहेत. सकाळच्या वेळी रेल्वे चुकली, की दादरमार्गे प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने सकाळ, संध्याकाळच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ करावी.
- दिनेश सावंत, रेल्वे प्रवासी

Bhiwandi Road
Mumbai Local: मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात; मात्र सिग्नल यंत्रणेचा दोष चव्हाट्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com