महापालिकेच्या दणक्यानंतर डी मार्टने भरला दीड कोटींचा कर

महापालिकेच्या दणक्यानंतर डी मार्टने भरला दीड कोटींचा कर

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : महापालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या सानपाडा येथील डी मार्टवर जप्तीची कारवाई करताच डी मार्ट व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. पालिकेच्या कारवाईनंतर डी मार्ट प्रशासनाने महापालिकेचा थकीत एक कोटी ६० लाख रुपयांचा मालमत्ता कर ऑनलाईन भरणा केला आहे. त्यामुळे महापालिकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली.
सानपाडा सेक्टर १० येथे असलेल्या डी मार्टचे मालमत्ता कराचे एक कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रुपये थकीत होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने कर भरण्यासाठी डी मार्टला सात दिवसांची नोटीस दिली होती; परंतु संबंधितांकडून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने गुरुवारी (ता. ४) अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख सुजाता ढोले यांचेकडून डी मार्टची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी (ता. ५) दुपारी २ वाजता तुर्भे विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली अधीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह प्रकाश वाकचौरे, संजय तडवी, पंकज राठोड, प्रकाश झोरे, रोहन घरत व इतर दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्तीच्या कारवाईसाठी डी मार्ट आस्थापनेला भेट दिली. या वेळी डी मार्टमधील व्यवस्थापकांनी मालमत्ता कर व थकबाकीचा एक कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रकमेचा धनादेश देण्याची तयारी दर्शवली.

-----------------
ऑनलाईन रक्कम भरणा
धनादेश वटण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने महापालिका समूहाने जप्तीची कारवाई केली. मात्र, डी मार्ट प्रशासनाच्या कायदेविषयक विभागाने सुजाता ढोले यांच्याशी संवाद साधून मालमत्ता कराच्या थकीत रकमेसह सर्व रक्कम एकरकमी ऑनलाईन भरणा करण्याची तयारी दर्शविली. लगेचच पूर्ण रक्कम १ कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रुपये ऑनलाईन भरणा केली. त्यामुळे जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com