केईएम रुग्णालयात अद्यावत वीज यंत्रणा

केईएम रुग्णालयात अद्यावत वीज यंत्रणा

केईएम रुग्णालयात अद्यावत वीज यंत्रणा
रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्याचा पालिकेचा निर्णय


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : शस्त्रक्रियेवेळी मशिनरीत बिघाड झाल्यास रुग्णाला विजेचा झटका बसून दुर्घटना घडू नये, यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल शासकीय रुग्णालयात बसवण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या या उपकरणाचा वापर यशस्वी झाल्यानंतर अन्य रुग्णालयांतही या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यासाठी पालिका साडेसहा कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने आज दिली.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत असतात. त्यातील किरकोळ आजारांवरील रुग्णांना बाह्य रुग्ण सेवेद्वारे उपचार केले जातात, तर काही गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील रुग्णांना दाखल करून घेतले जाते. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील इतरही विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये काही विद्युत उपकरणे रुग्णांच्या थेट संपर्कात येतात. शस्त्रक्रिया विभागात विविध उच्च क्षमतेच्या मशीनरी वापरल्या जातात. शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या उपकरणात काही बिघाड झाल्यास किंवा वीजेची गळती झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याने १ मिली ॲम्पियर एवढा कमी विद्युतप्रवाहसुद्धा रुग्णाच्या जीवितास घातक ठरू शकतो. या घटना टाळण्यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल हे उपयुक्त ठरतात.


जागतिक विद्युत नामांकनानुसार शस्त्रक्रिया विभाग हा गट-२ म्हणजेच अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी गळती झालेला विद्युतप्रवाह रुग्णाच्या शरीरात प्रवाहित न होणे तसेच यंत्रणेत काही बिघाड झाल्यास शस्त्रक्रिया विभागातील विद्युतप्रवाह खंडित न होणे, यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com