पालिका खरेदी करणार १५ चारचाकी वाहने

पालिका खरेदी करणार १५ चारचाकी वाहने

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पालिकेच्या सहायक आयुक्तांच्या वापरातील गाड्या आयुर्मान संपल्याने वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे जुनी वाहने बदलून नवीन वाहने घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेकडून एकूण १५ गाड्या खरेदी करण्यात येणार असून यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
पालिकेच्या सहायक आयुक्तांसाठी महिंद्र अँड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ वाहने खरेदी करण्यात येत आहे. यासाठी १३ लाख २ हजार किमतीमध्ये या चारचाकी वाहनांची खरेदी केली जाणार असून १५ चाराचाकांसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही वाहने थेट उत्पादन कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये ही वाहने सहायक आयुक्तांच्या वापरासाठी दाखल होतील. महापालिकेने डिसेंबर २०२१मध्ये चारचाकी वाहनांची खरेदी केली होती. या त्यावेळी या स्कॉर्पिओचा वाहनांचा दर ११ लाख ३४ हजार एवढा होता, त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये या वाहनांच्या किमतीमध्ये दीड लाखांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांच्या वापरासाठी सध्या पुरवण्यात येणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वापरली गेल्यामुळे त्यात वारंवार बिघाड होत आहे. विभागाचे अधिकारी आपत्कालीन कामांमध्ये सक्रिय होत असल्याने त्यांना वाहनांची सेवा सुरळीत मिळावी, म्हणून १५ वाहने खरेदी केली जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com